शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खावलीजवळ विद्यापीठ उपकेंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:55 IST

सातारा : सातारा तालुक्यातील खावली गावाजवळ कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठा चे उपकेंद्र होणार आहे. क्षेत्रमाहुली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या या जागेबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचा ठराव घेऊन शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. येथील सुमारे शंभर एकर जागेची पाहणीही बुधवारी करण्यात आली.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या दालनात या कामाच्या अनुषंगाने बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ...

सातारा : सातारा तालुक्यातील खावली गावाजवळ कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होणार आहे. क्षेत्रमाहुली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या या जागेबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचा ठराव घेऊन शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. येथील सुमारे शंभर एकर जागेची पाहणीही बुधवारी करण्यात आली.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या दालनात या कामाच्या अनुषंगाने बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उपकेंद्राच्या उभारणीबाबत सविस्तर चर्चा झाली. क्षेत्रमाहुली ग्रामपंचायतीच्या हद्दीत शासनाच्या मालकीची सुमारे ७१ हेक्टर जागा उपलब्ध आहे. यापैकी १०० एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. ही जागा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेचा ठराव होणे आवश्यक आहे. जागा मागणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले असून ठराव झाल्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.या चर्चेनंतर खासदार उदयनराजे भोसले, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, रजिस्ट्रार डॉ. विलास नांदवडेकर, अ‍ॅकॅडमिक अ‍ॅडव्हायझर डॉ. डी. आर. मोरे यांच्यासह विद्यापीठाचे सिनेट सदस्य अ‍ॅड. डी. जी. बनकर, अमित कुलकर्णी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, ‘साविआ’चे कार्याध्यक्ष शिरीष चिटणीस, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, नगरपरिषदेचे बांधकाम सभापती मनोज शेंडे, जावळीचे अमित कदम आदींनी क्षेत्रमाहुली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी प्रस्तावित केलेल्या जागेची पाहणी केली.दरम्यान, खा. उदयनराजे यांनी पत्रकात म्हटले आहे, जिल्हाधिकाºयांसमवेत डॉ. देवानंद शिंदे यांच्याबरोबर संयुक्त बैठक झाली. या बैठकीत खावली येथील जागाही निश्चित करण्यात येऊन जागेची पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाशी संलग्न आहेत. १९६२ पासून महाविद्यालयीन पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा संबंध हा शिवाजी विद्यापीठाशी येत असतो. त्यामुळे विद्यापीठाशी कोणत्याही कारणाने संपर्क साधण्याचा झाल्यास त्यासाठी कोल्हापूर येथे जावे लागते.कौटुंबिक परिस्थिती बेताची असलेल्यांना कोल्हापूर येथे जाण्याचा आणखीनच जास्त उपद्व्याप सहन करावा लागतो. यासाठी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. येत्या सहा महिन्यांत बांधकामाचा प्रारंभ करण्यात येईल. हे उपकेंद्र सुरू झाल्यावर कालांतराने सोलापूर विद्यापीठासारखे सातारा विद्यापीठ स्वतंत्रपणे निर्माण केले जाईल, असे स्पष्ट केले.वैद्यकीय महाविद्यालयाचा अडथळा दूरविद्यापीठ उपकेंद्राच्या निर्मितीसाठी खावलीजवळील या जागेच्या मागणीचा प्रस्ताव यापूर्वी जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आला होता; परंतु त्यावेळी ही जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित केली असल्याने जिल्हा परिषदेने ठराव नामंजूर केला होता. आता वैद्यकीय महाविद्यालयासाठी कृष्णा खोरे महामंडळाची जागा निश्चित झाल्याने विद्यापीठ उपकेंद्र उभारणीत अडथळा राहिलेला नाही.